Chicken handi recipe marathi: सुट्टी म्हटलं की मस्तपैकी उशिरा उठणं आणि आवडत्या जेवणावर ताव मारणं आलंच. आता हे आवडतं जेवण कोणतं, तर बरेचजण उत्तर देतील चिकनचा बेत असणारं. तुम्हीही असाच बेत आखताय का? तर आज चिकनची एक स्पेशल रेसिपी ट्राय करा. या रेसिपीचं नाव आहे चिकन हंडी. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायलाही छान लागते. अशा परिस्थितीत चला जाणून घेऊया चिकन हंडी कशी बनवायची.
चिकन हंडी साहित्य
- ५०० ग्राम चिकन
- चिकन मॅरीनेट करण्यासाठी
- १ टीस्पून काळीमिरी पूड
- अर्ध्या लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
- ग्रेव्ही साठी
- २ टेबलस्पून तूप
- २ मोठ्या कांद्याची पेस्ट
- २ मोठे टोमॅटो
- १०-१२ काजू
- १ टेबलस्पून आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट
- १ टीस्पून लाल तिखट
- १/२ टीस्पून हळद
- १०० ग्राम दही
- १०० मि.ली पाणी
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टेबलस्पून कसुरी मेथी
चिकन हंडी कृती
१. सर्वात आधी चिकनला काळीमिरी पूड, मीठ आणि लिंबाचा रस लावून अर्धा तास मॅरीनेट करा. त्यानंतर कांद्याची पेस्ट करून घ्या. टोमॅटो आणि काजूची पेस्ट करून घ्या.
२. त्यानंतर एका भांड्यात तूप गरम करा, त्यात कांद्याची पेस्ट रंग बदलेपर्यंत परतून घ्या, त्यानंतर त्यात आलं लसूण मिरची पेस्ट घालून मिक्स करा.
३. २ मिनिटांनी त्यात मॅरीनेट केलेलं चिकन घालून परतावे, चिकनचा रंग बदलला की त्यात, लाल तिखट, हळद आणि थोडी कस्तुरी मेथी घालून परतून घ्या.
४. २-३ मिनिटे परतल्यावर त्यात टोमॅटो आणि काजूची पेस्ट घालून घ्या. आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात दही घालून घ्या आणि परत तेल सुटेपर्यंत थांबा.
५. नंतर त्यात पाणी घालून मिक्स करून घ्या. मुगलाई चिकन हंडी इन रेड ग्रेव्ही
६. आता यात गरम मसाला, परत थोडी कस्तुरी मेथी आणि बारिक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
हेही वाचा >> रात्रीच्या जेवणाचा चमचमीत बेत; रुचकर मऊ आणि लुसलुशीत गाजराचा भात, ‘ही’ घ्या सोपी रेसिपी
७. चिकन शिजले आहे आणि आपली ग्रेव्ही ही मस्त तयार आहे. गरमगरम सर्व्ह करा आणि या पावसात या मसालेदार रेसिपीचा आनंद घ्या.