दीपा पाटील
साहित्य – १ वाटी काळी उडदाची डाळ, अर्धा किलो चिकन, २-२ कांदे-टोमॅटो, २ चमचे आले-लसूण वाटलेले, १ चमचा वाटलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा हळद, १चमचा तिखट, १ चमचा धनेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी तेल, मीठ.
कृती – उडीद डाळ दोन तास भिजवून घ्यावी. त्यानंतर कुकरमध्ये २ शिट्टय़ा काढून वाफवून घ्यावी. दुसऱ्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण, मिरची, टोमॅटो, हळद, तिखट, धनेपूड, गरम मसाला असे सगळे घालून मस्त परतून घ्यावे. यात साफ केलेले आणि व्यवस्थित कापून घेतलेले चिकन घालून एक वाफ आणावी. यानंतर यात शिजवलेली उडीद डाळ आणि थोडे पाणी आणि मीठ घालून पुन्हा चांगली वाफ आणावी. चिकन चांगले शिजले की, शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पातेले आचेवरून खाली उतरवावे.