शुभा प्रभू साटम

साहित्य :

बोनलेस चिकन, दही, लोणी, लसूण, मीठ, मिरपूड, लिंबू रस, किंचित साखर, ड्राय हर्ब्ज.

कृती

बोनलेस चिकनचे बारीक तुकडे करून घ्या. भांडय़ात लोणी गरम करून त्यात लसणाची फोडणी करा आणि त्यावर हे चिकनचे तुकडे परतून घ्या. हे होईपर्यंत दही कापडात टांगून ठेवावे किंवा चाळणीवर ठेवावे. परतलेले चिकन नीट कुस्करून घ्यावे. त्यात चक्का घालावा. ड्राय हब्र्ज, मीठ, मिरपूड, लिंबू रस आणि किंचित साखर घालून सारखे करावे. ब्रेडला चीझ स्प्रेड किंवा बटर लावून घ्यावे. त्यावर चिकनचे हे मिश्रण पसरून सँडविच बंद करावे. छानपैकी ग्रील करावे किंवा तसेच द्यावे. या सँडविचमध्ये उकडून किसलेला बटाटा किंवा सॅलडची पानेसुद्धा घालता येतील.

Story img Loader