Chicken Starter Recipe : तुम्ही चिकन प्रेमी असाल आणि तुम्हालाही चिकनचे वेगवेगळे पदार्थ बनवून खायला आवडत असतील तर तुम्हाला ढाबा स्टाइल मुघलाई चिकनची ही रेसिपी आवडेल. तुम्ही लंच, डिनर किंवा कोणत्याही पार्टी मेन्यूमध्ये या रेसिपीचा समावेश करु शकतात. थोडीशी रिच अशी ही रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला चविष्ट आहे. चला तर मग क्षणाचाही विलंब न करता ढाबा स्टाइल मुघलाई चिकन कसे बनवायचे जाणून घेऊ….
ढाबा स्टाइल मुघलाई चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य
अर्धा किलो चिकन,
३ चमचे काळीमिरी पूड
६- ७ लवंग
२ काळ्या मोठ्या वेलची
२ काळी वेलची
२ हिरवी वेलची
१ इंच दालचिनीचा तुकडा
अर्धा जायफळ
२ तमालपत्र
४ ते ५ सुक्या लाल मिरच्या
२ चमचे तूप
२ चमचे तेल
१ जावित्री
दोन मोठे चिरलेले कांदे
हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पेस्ट
गरम मसाला,
१ कप दही
अर्धा कप कुरकुरीत तळलेले कांदे
ढाबा स्टाईल मुघलाई चिकन बनवण्याची कृती
ढाबा स्टाईल मुघलाई चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम चिकन स्वच्छ धुवून त्यावर दही लावून ठेवा. यानंतर काळी मिरी, जावित्री, हिरवी, वेलची, दालचिनीचा तुकडा असे सर्व गरम मसाले थोडे ठेचून घ्या. आता एका कुकर किंवा खोलगट कढईत तेल आणि तूप गरम करा, तेल-तूप गरम होताच त्यात हे ठेचलेले मसाले टाकून ४ ते ५ सेकंद परतत राहा, यानंतर कांदा टाकून तोही ३ ते ४ मिनिटांपर्यंत शिजवा यात आता हिरव्या मिरच्या, आलं, लसूण पेस्ट टाका, यानंतर चिकन टाकून ते ६ ते ७ मिनिटे शिजू द्या. पुढे मीठ आणि कुरकुरीच कांदे त्यात टाका, यानंतर १/४ कप पाणी टाका आणि चांगले प्रकारे ढवळून शिजवू द्या. कुकरचे झाकण बंद करुन ते मंद आचेवर शिजवा, (कुकरची शिट्टी होऊ देऊ नका) अंदाजे शिजल असेल असे लक्षात येताच कुकर खालचा गॅस बंद करा. कुकर थंड होताच उघडा आणि त्यात मीठ वैगरे बरोबर आहे की नाही ते चेक करा. अशाप्रकारे ढाबा स्टाइल मुघलाई चिकन रेसिपी खाण्यासाठी तयार आहे.