Chicken Tikka Recipe: चिकन म्हणजे अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात बटर चिकन, चिकन मसाला, चिकन कोल्हापुरी आदी चिकनचे पदार्थ खूप जणांनी ट्राय केले असतात. या पदार्थांचं नाव काढताच आपसूकचं तोंडाला पाणी सुटतं. त्यातल्या त्यात ‘चिकन टिक्का’ अनेकांचा आवडीचा असतो. पण हा पदार्थ बनवायला खूप वेळ जातो आणि खूप मेहनतही लागते असं अनेकांना वाटतं. पण आज आम्ही तुमच्यासाठी हा खास पदार्थ अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीने कसा बनवला जातो त्याची ट्रिक घेऊन आलो आहोत. हा पदार्थ बनवून तुम्ही तुमचा खास दिवस आणखीन खास करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या ‘चिकन टिक्का इजी व्हर्जन’.
हेही वाचा… हिवाळ्यात स्ट्रॉबेरीची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग झटपट बनवा ‘स्ट्रॉबेरी साल्सा’
चिकन टिक्का साहित्य
- 1 किलो चिकन (हाड असलेलं)
- 1 कप हंग कर्ड (दही)
- 2 टीस्पून आले-लसूण पेस्ट
- 1/2 टीस्पून हळद
- 2 टीस्पून धणे पावडर
- 1 टीस्पून लाल मिरची पावडर
- चवीनुसार मीठ
- 2 टीस्पून भाजलेलं बेसन
- 2 टीस्पून तेल (मोहरीचे)
- आवडीनुसार कसूरी मेथी
- 1/2 टीस्पून गरम मसाला
- 2 टीस्पून लिंबाचा रस
हेही वाचा… स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
चिकन टिक्का कृती (Chicken Tikka Easy Recipe)
१. प्रथम एका मोठ्या बाउलमध्ये धुतलेले चिकनचे तुकडे, हंग कर्ड (दही), आले-लसूण पेस्ट, धणे पावडर, लाल मिरची पावडर, मीठ, भाजलेल बेसन, तेल (मोहरीचे), लिंबाचा रस, गरम मसाला घ्या.
२. सगळं चांगलं मिसळा आणि रात्रभर फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी ठेवा .
३. नॉन-स्टिक पॅन गरम करा. पॅन गरम झाल्यावर मॅरेनेट केलेले चिकन तुकडे पॅनमध्ये ठेवा. किमान ५ ते ८ मिनिटे उच्च आचेवर दोन्ही बाजूंनी शिजवा, जोपर्यंत चिकन सोनेरी रंगाचं आणि पूर्णपणे शिजलेलं होईल तोपर्यंत ते पॅनमध्ये ठेवा.
४. चिकन शिजवून झाल्यावर, गरमागरम सर्व करा.