Recipe: अनेकांना कारलं, भेंडी, दुधी अशा भाज्या खायचा खूप कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही त्या भाज्यांपासून वेगवेगळे नवीन पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता. जेणेकरून तुम्हाला त्या भाज्यांमधील पोषकतत्वदेखील मिळतील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधीचा ठेपला कसा बनवायचा हे सांगणार आहोत. जाणून घ्या साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुधीचा ठेपला बनवण्यासाठी साहित्य:

१. ३ कप गव्हाचे पीठ
२. १/२ कप दुधी
३. २ चमचा दही
४. १ चमचा हळद
५. ७-८ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
६. ६-७ लसूण पाकळ्या ठेचलेल्या
७. २ चमचे तेल
८. मीठ चवीनुसार

दुधीचा ठेपला बनवण्याची कृती:

हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा चमचमीत ‘सोयाबीन कबाब’; नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी दुधी व्यवस्थित किसून घ्या.

२. त्यानंतर त्यातील पाणी गाळून बाजूला काढा.

३. आता किसलेल्या दुधीमध्ये गव्हाचे पीठ, दही, हळद, हिरव्या मिरच्या, लसूण, तेल, मीठ घालून व्यवस्थित मळून घ्या.

४. आता मळलेल्या पीठाचे समान गोळे करून घ्या आणि गोलाकार ठेपला लाटून घ्या.

५. त्यानंतर नॉन-स्टीक तव्यावर मंद आचेवर सर्व ठेपले तेल न लावता शेकून घ्या.

६. तयार गरमागरम दुधीचे ठेपले पुदीन्याच्या चटणीसह सर्व्ह करा.