Chilli Gobhi Recipe: तुम्ही अनेकदा कोबीची भजी, कोबीचे पराठे खाऊन बघितलेच असतील. ज्यांना कोबी आवडते त्यांना असे नवनवे पदार्थ ट्राय करायलाही आवडतात. आज आपण अशीच एक नवीकोरी कोबीची रेसिपी ट्राय करणार आहोत. ज्याचं नाव आहे ‘चिली कोबी रेसिपी’. अगदी चवदार, कुरकुरीत अशी ही रेसिपी अगदी झटक्यात तयार होते. चला तर मग पाहूया चिली कोबी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती.
साहित्य
कोबी
कॉर्न फ्लोर
लाल तिखट
मीठ
चिरलेली लसूण
हिरवी मिरची
१ चिरलेला कांदा
चिरलेली शिमला मिरची
२ टिस्पून लाल तिखट
टोमॅटो केचप
सोया सॉस
कॉर्न फ्लोर
सफेद तीळ
हिरवी कोथिंबीर
हेही वाचा… चमचमीत खायचं मन करतंय? मग या सोप्या पद्धतीने बनवा ‘चना चाट’, लिहून घ्या साहित्य आणि कृती
कृती
प्रथम कोबीचे तुकडे करा आणि ती गरम पाण्याने आणि मीठाने स्वच्छ करा.
नंतर त्यात कॉर्न फ्लोर, लाल तिखट आणि मीठ घाला.
तीव्र आचेवर तळा.
एका कढईत, चिरलेली लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला. त्यात १ चिरलेला कांदा आणि चिरलेली शिमला मिरची घाला. ते चांगले परता.
त्यात २ टिस्पून लाल तिखट सॉस, टोमॅटो केचप आणि सोया सॉस घाला.
कॉर्न फ्लोर आणि पाणी घाला.
तळलेली कोबी, सफेद तीळ आणि हिरवी कोथिंबीर घाला.
तुमचा ‘चिली कोबी’ तयार आहे. चवीने खा!
हेही वाचा… बटाट्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग ‘पोटॅटो लिफाफा’ एकदा करून पाहाच, लगेच लिहून घ्या रेसिपी
पाहा VIDEO
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.