Chilli Paneer Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी सगळ्यांच्या आवडीची पनीरची रेसिपी जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे चिली पनीर.

साहित्य

२०० ग्रॅम पनीर

How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती
Ragi Satwa Recipe
घरच्या घरी फक्त काही मिनिटांत तुमच्या बाळासाठी बनवा नाचणी सत्व; वाचा साहित्य आणि कृती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय
Kairiche Lonche recipe,
१५ मिनिटांत ‘कैरीचं लोणचं’ बनवायचंय? मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे, लगेच वाचा साहित्य आणि कृती
Khari Biscuit Recipe:
Video : घरच्या घरी बनवा चहाबरोबर खायला आवडणारी खारी! ही सोपी रेसिपी एकदा पाहाच

१ टीस्पून लाल तिखट

३ टीस्पून कॉर्नफ्लोर

आले

लसूण

हिरवी मिरची

१ टीस्पून लाल चटणी

१ टीस्पून हिरवी चटणी

२ टेबलस्पून सोया सॉस

१ टीस्पून व्हिनेगर

मैदा

पांढरे तिळ

हेही वाचा… ‘पोटॅटो ब्रेड रोल’ची जबरदस्त सोपी मराठी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल

कृती

१. प्रथम एका भांड्यात २०० ग्रॅम पनीरचे तुकडे घ्या, त्यात १ टेबलस्पून लाल तिखट, १ टीस्पून मीठ आणि ३ टीस्पून कॉर्नफ्लोर घाला आणि चांगले मिक्स करून घ्या.

२. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन हे पनीरचे तुकडे मध्यम आचेवर तळा आणि बाजूला काढून घ्या.

३. एका पातेल्यात २ टेबलस्पून तेल गरम करा, त्यात कापलेला आले, लसूण आणि हिरवी मिरची घाला. त्यात १ चिरलेली शिमला मिरची आणि कांदा घाला आणि २ मिनिटे शिजवा.

५. त्यानंतर त्यावर २ टेबलस्पून सोया सॉस, १ टीस्पून हिरवी चटणी, १ टीस्पून व्हिनेगर आणि १ टीस्पून लाल चटणी घाला.

६. त्यानंतर त्यात पाण्यात विरघळवलेला कॉर्नफ्लोर आणि मैदा यांचा मिश्रण (स्लरी) घाला.

७. हे चांगले मिसळा जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही.

८. वर थोडा पांढरे तिळ टाका आणि गरमागरम सर्व्ह करा.

९. अशाप्रकारे चिली पनीर तयार आहे. आनंद घ्या!

हेही वाचा… घरच्या घरी झटपट करा चविष्ट ‘दाबेली’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती

ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader