Chinese Veg Fried Rice : लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोकांना चायनीजचे पदार्थ खायला आवडतात. चायनिज नूडल्स असो किंवा चायनिज मंच्युरियन लोकं आवडीने खातात. चायनिज व्हेज फ्राइड राइसवर लोकं तुटून पडतात.चायनिज व्हेज फ्राइड खायची इच्छा झाली तर आपण घराबाहेर पडतो पण तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट चायनिज व्हेज फ्राइड राइस करू शकता.घरी चायनिज व्हेज फ्राइड राइस कसा बनवायचा, याची सोपी रेसिपी जाणून घ्या

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • गोल्डनसेला बासमती तांदूळ
  • पत्ता कोबी
  • शिमला मिरची
  • गाजर
  • कांदा
  • कांद्याची पात
  • आलं लसूण
  • हिरव्या मिरच्या
  • शेजवान सॉस
  • सोया सॉस
  • ग्रीन चिली सॉस
  • पांढऱ्या मिरचीचे पावडर
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : Kothimbir Paratha : स्वादिष्ट कोथिंबीर पराठा कसा बनवायचा? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

कृती

  • सुरुवातीला गोल्डनसेला बासमती तांदूळ चार पाच तास भिजवून ठेवावा आणि त्यानंतर तांदूळ शिजवून मोकळा भात करावा.
  • शिमला मिरची, गाजर आणि पत्ता कोबी आणि फूल कोबी बारीक चिरावी
  • कढईत तेल गरम करा
  • त्यात आलं लसूण, कांदा चांगले परतून घ्या
  • गाजर, शिमला मिरची, पत्ता कोबी, हिरवी मिरची टाका आणि चांगल्याने परतून घ्या
  • त्यानंतर त्यात शिजवलेला भात टाका आणि मिश्रण एकत्र करा
  • त्यात चवीनुसार मीठ टाका
  • त्यानंतर त्यात ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आणि शेजवान सॉस टाका.
  • पांढऱ्या मिरचीचं पावडर त्यात टाका
  • त्यात पांढरे व्हिनेगर टाका आणि सर्व मिश्रण मिक्स करा.
  • चायनीज व्हेज फ्राइड राइस बनल्यानंतर सर्व्ह करताना त्यावर कांद्याची पात टाका.