Chocolate Cake : सध्या सगळीकडे रक्षाबंधनची जय्यत तयारी सुरू आहे. या रक्षाबंधनच्या दिवशी काय गोड करावं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही चॉकलेट केक बनवू शकता. चॉकलेट केक हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. घरच्या घरी चॉकलेट केक कसा बनवायचा, चला तर जाणून घेऊ या.
साहित्य
- मैदा
- पीठी साखर
- २ अंडी
- ताजे दही
- कोको पावडर
- खायचा सोडा
- वितळलेले लोणी
- व्हॅनिला इसेंस
हेही वाचा : कच्च्या केळीची भाजी खाल्ली का? जाणून घ्या ही हटके रेसिपी
कृती :
- मैदा गाळून घ्या
- त्यात कोको पावडर आणि खायचा सोडा मिक्स करा.
- लोणी आणि अंडे एकत्र करा
- त्यात साखर घालून चांगले ढवळून घ्या
- त्यात दही टाका आणि चांगल्याने मिक्स करा.
- थोडा थोडा मैदा घालून मिसळत रहा.
- मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात थोडे पाणी व एसेंस घाला
- ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा त्या भांड्याला तूप लावा
- आणि वरील मिश्रण पॉटमध्ये भरा आणि ओव्हनमध्ये ठेवा
- जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता
- फक्त कुकरची शिट्टी काढून घ्यावी
- केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करा.