साहित्य

१ ताजे किंवा गोठवलेलं केळं, १कप चॉकलेट आइसक्रीम, १चमचा चॉकलेट सिरप, अर्धा कप बर्फाचा चुरा.

कृती

केळ्याच्या फोडी करा. ब्लेंडरमध्ये फोडी, आइसक्रीम आणि चॉकलेट सिरप घालून ते छान फिरवून घ्या. गुळगुळीत झाल्यावर थांबा. एका पेल्यामध्ये बर्फाचा चुरा भरा. त्यावर हे मिश्रण ओता. यावर सजावटीसाठी चॉकलेटही किसून घालता येईल. बनवल्यावर लगेचच गट्टम करा.

Story img Loader