नीलेश लिमये nilesh@chefneel.com
केक हा परदेशी पदार्थ. पण आता आपल्याकडेही प्रत्येक समारंभाला केक असतोच. या नवीन वर्षांत आपल्या सदराची सुरुवात करू या, अशाच चवदार केकच्या पाककृतीने. बाकी पुढे संपूर्ण वर्षभर विविध परदेशी पाककृतींची ओळख करून घेऊच!
साहित्य
२-३ मोठी संत्री, ५ अंडी, दीड चमचा बेकिंग पावडर, १ चमचा खायचा सोडा, अर्धा कप कोको, २ कप काजू-बदामाची पूड, ३० मिली डार्क रम, १ चमचा दालचिनी पावडर.
कृती
प्रेशर कुकरमधून ३ शिट्टय़ा काढून संत्री वाफवून घ्या. त्याच्या बिया काढून ती वाटून घ्या. त्याचा घट्टसर रस तयार व्हायला हवा. या रसामध्ये बेकिंग पावडर, सोडा, काजूची पूड, साखर आणि कोको पावडर घालून एकजीव करून घ्या. केकच्या अर्धा किलोच्या साच्यामध्ये थोडंसं बटर लावून त्यात हे मिश्रण ओता. ओव्हन १८० अंश सेल्सिअसवर तापवून घ्या. केक ४५-५० मिनिटे बेक करा. केकच्या मधोमध सुरी घालून तपासून पाहा की केक शिजलाय की नाही. सुरीला काही न चिकटता ती बाहेर आली की समजावे, केक नीट झाला आहे. साच्यातून बाहेर काढल्यावर या केकवर पिठी साखर शिंपडू शकता किंवा चॉकलेट सॉससुद्धा घालू शकता.