Chocolate Pancakes Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच केक खूप आवडतो. अगदी आवडीने ते केक खातात. कोणाच्या बर्थडेला किंवा कोणत्या पार्टीत खाल्लेला हा केक अनेकदा घरच्या घरी बनवायचा विचार अनेकजण करतात. पण यात खूप वेळ वाया जाईल म्हणून कोणी कष्ट घ्यायला मागत नाही. पण आता अगदी भलामोठा केक न बनवता तुम्ही झटक्यात घरच्या घरी पॅनकेक बनवू शकता. आज आपण अशाच चॉकलेट पॅनकेकची रेसिपी जाणून घेणार आहोत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
साहित्य
चॉकलेट बिस्किटे
२ चमचे कोको पावडर
१ चमचा बेकिंग सोडा
दूध
चॉकलेट स्प्रेड
कृती
- तुमच्या आवडीनुसार चॉकलेट बिस्किटे घ्या.
- ती बारीक पीसून घ्या.
- त्यात २ चमचे कोको पावडर, १ चमचा बेकिंग सोडा आणि दूध घाला.
- एकसारखा, गुळगुळीत बॅटर तयार करा.
- बॅटर पॅनवर घाला.
- कमी आचेवर दोन्ही बाजूंनी शिजवा.
- चॉकलेट स्प्रेड लावा आणि तुमच्या आवडीची टॉपिंग घाला.
- तुमचा स्वादिष्ट चॉकलेट पॅनकेक तयार आहे. आनंद घ्या!
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.
First published on: 30-12-2024 at 20:18 IST
© IE Online Media Services (P) Ltd
© IE Online Media Services (P) Ltd
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chocolate pancakes recipe in marathi dvr