डोनट्स लहान मुले खूप आवडीने खातात. डोनट दिसायला खूप आकर्षक आणि बनवायलाही सोपे असतात. अगदी मेदू वड्यासारखे गोल आकाराचे हे डोनट चवीला गोड असतात. गरमागरम डोनटवर थोडीशी पिठीसाखर भुरभुरवून खाण्याची एक वेगळी मज्जा असते. त्यामुळे घरीच डोनट्स कसे बनवायचे याची रेसिपी आपण पाहणार आहोत.
साहित्य
1 कप मैदा
1/2 वाटी पिठीसाखर
2 टेस्पून दूध पावडर
1 टीस्पून बेकिंग सोडा
1 कप दूध
तेल तळण्यासाठी
पीनट बटर
डार्क चॉकलेट
पाव कप फ्रेश क्रीम
चिमूटभर मीठ
कृती
१) सर्वप्रथम एका बाऊलमध्ये मैदा, साखर पावडर, मिल्क पावडर, पिठीसाखर, बेकिंग पावडर घेऊन सर्व पदार्थ चांगले मिसळा.
२) आता त्यात एक कप दूध टाकून पीठ घट्ट मळून घ्या. पीठ मळतानाच त्यात बटर घाला. आता झाकण ठेवून बाजूला ठेवा.
३) यानंतर जाड पोळी लाटून घ्या. वाटीचा वापर करून डोनट कट करून घ्या. आता गरम तेलात मध्यम आचेवर सर्व डोनट तळून घ्या. तळलेल्या डोनटवर पिठी साखर भुरभुरा. जर तुम्हाला नुसत्या साखरेऐवजी चॉकलेट खाण्याची इच्छा असेल, तर डार्क चॉकलेट आणि फ्रेश क्रीम एकत्र छान वितळवून घ्या. क्रीम जास्त सैल करू नका.
४) आता हे क्रीम डोनटवर लावून, त्यावर कॅण्डी किंवा गेम्सच्या गोळ्यांनी गार्निश करून सर्व्ह करा.