ज्योती चौधरी-मलिक
हे लाडू सणासुदीला मुद्दाम केले जातात. श्रावण सोमवारी किंवा गौरी-गणपतीला हा एक खास नैवेद्य असतो.
आणखी वाचा
साहित्य
१ वाटी तूप, १ वाटी पिठीसाखर, १ वाटी कणिक, १ चमचा खसखस, १ चमचा वेलची पूड.
कृती
कणिक एका कपडय़ात सैलसर पुरचुंडी बांधून चाळणीवर ठेवून १० मिनिटे वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर पुरचुंडी सोडून आतला कणकेचा गोळा हातांनी चुरडून घ्यावा. याचे खुसखुशीत पीठ तयार होईल. त्यात तूप, पिठीसाखर, वेलचीपूड आणि चमचाभर खसखस भाजून घालावी. आता या मिश्रणाचे छान लाडू वळावे. आवडत असल्यास काजू, बदाम किंवा मनुकाही घालता येतील. हे लाडू पौष्टिक आणि झटपट बनणारे तर आहेतच शिवाय चवीलाही मस्त आहेत.