Clams Curry: खाण्याच्या प्रेमापोटी खवय्ये लोकप्रिय पदार्थावर ताव मारताना दिसतात. जे घरात बनतं ते हॉटेलमध्ये जाऊन का खायचं? त्यात जर तुम्ही नॉनव्हेज लव्हर, नॉनवेजचे शौकीन असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त रेसिपी घेऊन आलो आहोत. चिकन, मटण तर आपण बनवतच असतो. मात्र आज आम्ही तमच्यासाठी घेऊन आलो आहोत चटकदार असे शिंपले फ्राय. या रेसिपीचे वैशिष्ट्य म्हणजे ही फार कमी वेळात तयार होते. चला तर मग जाणून घेऊया कसं बनवायचं शिंपले फ्राय रेसिपी.

शिंपले फ्राय साहित्य –

  • २ वाट्या शिंपल्या, अर्धी वाटी ओला नारळ
  • ४-५ हिरव्या मिरच्या, ५ लसूण पाकळ्या
  • कोथिंबीर, १ वाटी बेसन
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • तेल, मीठ चवीनुसार

शिंपले फ्राय कृती –

सर्व प्रथम शिंपले पाण्यात साफ करुन घ्या. ओलं खोबरं, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, मीठ टाकून चटणी वाटूण घ्या. ही चटणी प्रत्येक शिंपल्यास मांस असलेल्या भागावर थोडी-थोडी लावून घ्या. बेसनामध्ये मीठ टाकून भज्याप्रमाणे पीठ भिजवून घ्या. तव्यावर तेल गरम का व शिंपले त्यात एक एक बुडवून चटणी लावलेली बाजू आधी खाली ठेवून ५ मिनिटे शिजवा. नंतर उलटून पुन्हा ५ मिनिटे शिजवा.

हेही वाचा – अस्सल मराठवाडी चवीचा मटण काळा रस्सा, जाणून घ्या सोपी रेसिपी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे शिंपले फ्राय चवीला अतिशय चटकदार स्वादिष्ट लागतात. तुम्हीही ही शिंपल्याची रेसिपी नक्की ट्राय करा, आणि कशी होते आम्हाला कळवा.