Sandwich Recipe: संध्याकाळच्या वेळी काहीतरी गरमागरम, कुरकुरीत खाण्याची इच्छा होत असते. पण नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. म्हणूनच आजची रेसिपी थोडी खास आहे. झटपट तयार होणाऱ्या या रेसिपीने नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल. चला तर मग आज क्लब सँडविच बनवुयात.
क्लब सँडविच साहित्य
- १ उकडलेले बीट
- ४ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे
- १ मोठ्या ब्राऊन ब्रेडचे पाकीट
- २ केलेले सिमला मिरची
- बारीक केलेले गाजर
- १ बारीक चिरलेला कांदा
- १ आडवा चिरलेला कांदा
- अमूल बटर
- १ चमचा ओरिगानो
- २ चमचे मायोनीज
- २ टोमॅटो आडवे चिरलेले
- १ चमचा चिली फ्लेक्स
- चवीनुसार मीठ, चवीनुसार चाट मसाला
- शेजवान चटणी
- २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- चिमूटभर लाल तिखट
- ४ चीज स्लाईस
- १ उकडलेले बारीक चिरलेले बिट
क्लब सँडविच कृती
प्रथम वरील बारीक चिरलेल्या भाज्या चवीनुसार मीठ चाट मसाला चिली फ्लेक्स, ओरिगानो, मायोनिज, बारीक चिरलेली हिरवी मिरची एका कढईत घेऊन सर्व मिक्स करावे व चांगले ढवळावे.
मग एका ब्रेडला शेजवान चटणी लावावी मग त्यावर वरील मिश्रण एक चमचा टाकावे नंतर त्यात वरती दुसरा ब्रेड ठेवावा व त्यावर टोमॅटो केचप लावून त्यावरआडवा कांदा, बटाटा, टोमॅटो ठेवावे, चीज स्लाईड ठेवावे तिसऱ्या ब्रेडला मायोनीज लावून ठेवावे.
यानंतर, पॅन गरम करा, त्यावर बटर लावा आणि नंतर सँडविच सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. खाण्यासाठी तयार क्लब सँडविच.तुम्ही हे सँडविच तुमच्या मुलाला चहासोबत सर्व्ह करू शकता.
सँडविच करण्यासाठी तुम्ही ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकता.