coconut laddu recipe: श्रावण महिन्यात विविध गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. आतापर्यंत आपण पुरणाची करंजी, पाकातल्या पुऱ्या, साटोऱ्या अशा विविध रेसिपी बनवल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला नारळाचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहोत. चला तर मग लिहून घ्या साहित्य आणि कृती…
नारळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- ४ कप किसलेले ओलं खोबरं
- १/४ कप मिल्क पावडर
- १/४ कप काजू
- १/४ कप वेलची पूड
- १/४ कप दूध
- १ कप साखर
- १ चमचा तूप
नारळाचे लाडू बनवण्याची कृती:
हेही वाचा: काहीतरी गोड खावसं वाटतंय? मग झटपट बनवा पाकातल्या पुऱ्या; नोट करा साहित्य आणि कृती
- सर्वात आधी एका पॅनमध्ये तूप टाकून त्यात खोबऱ्याचा किस मिक्स करून मंद आचेवर काही मिनिटे परतून घ्या.
- खोबरे लालसर झाल्यास त्यात दूध टाकून हे मिश्रण मंद आचेवर १० मिनिटे परतवून घ्या.
- आता एका मिक्सरच्या भांड्यात काजू आणि दूध पावडर घेऊन त्याची पूड करून घ्या आणि ही पावडर तयार मिश्रणात मिक्स करा.
- मिश्रण चांगले भाजून झाल्यावर त्यात साखर टाकावी.
- साखर वितळायला सुरुवात झाल्यानंतर मिश्रण घट्ट होईपर्यंत पुन्हा परतून घ्या.
- आता गॅस बंद करून मिश्रण थंड झाल्यावर त्याचे लाडू बनवा आणि सर्वांना सर्व्ह करा.