उन्हाळा सुरु झालाय, उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होतेय. उन्हाळ्यात थंड पदार्थ खाण्याकडे सर्वांचा कल असतो. आईस्क्रीम, थंड पेय सर्वाना खावीशी वाटते. कडाक्याच्या उन्हात घशाला कोरड पडते आणि आपल्याला सतत थंड काहीतरी खावसं वाटतं,चला तर मग ही स्पेशल डीश ट्राय करा. आज आम्ही उन्हाच्या कडाक्यात तुमच्यासाठी थंडगार असं कोकोनट मँगो पन्ना कोट्टा घेऊन आलोय. चला तर मग पाहुायात कशी करायची ही रेसिपी
कोकोनट मँगो पन्ना कोट्टा साहित्य –
- २ कप नारळाचे दूध
- चवीनुसार साखर / १/३ टीस्पून स्टीव्हिया
- १ टीस्पून व्हॅनिला अर्क
- १/४ चमचे जिलेटिन पावडर
- आपल्या आवडीची ताजी फळे
कोकोनट पन्ना कोट्टा असे बनवा –
एका सॉसपॅनमध्ये १ कप नारळाचे दूध आणि जिलेटिन पावडर एकत्र करा आणि ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यात व्हॅनिला अर्क घाला आणि मध्यम आचेवर गरम होऊ द्या. मिश्रण उकळू नये. मिश्रणात जिलेटिन पूर्णपणे विरघळल्यावर, गॅसवरून काढून टाका आणि साखर आणि उरलेले १ कप नारळाचे दूध घाला. आता ४ लहान भांड्यात ठेवा आणि ४ तास फ्रीजमध्ये ठेवा. ताज्या फळांसह सर्व्ह करा.
हेही वाचा – सोया मिल्क आणि खजूर स्मुदी प्या आणि हेल्दी राहा! झटपट होईल तयार, जाणून घ्या रेसिपी
उन्हाळ्यात हे खाण्यासाठी थंड तसेच पौष्टीकही आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी होते हे आम्हाला कळवा.