दीपा पाटील

साहित्य

साफ केलेली लहान कोलंबी १ वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे १ वाटी, वाटलेली लाल मिरची १चमचा, आले-लसूण वाटून १चमचा, १ अंडे, २ चमचे कोथिंबीर, ३ चमचे मैदा, अर्धा चमचा साखर, चवीपुरते मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती

मक्याचे दाणे थोडेसे ठेचून घ्यावे. कोलंबी बारीक चिरून घ्यावी. तेल सोडून बाकीचे सर्व साहित्य एकत्र करून त्याचे लिंबाएवढय़ा आकाराचे चपटे गोळे तयार करावेत. तेलात तळून घ्यावेत.

Story img Loader