आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळे पराठा खाल्ले असतील पराठा न खाल्लेला माणूस शोधून सापडणं तसं अवघड आहे. कारण पराठा हा सहज उपलब्ध होणारा एक लुसलुशीत खाद्य पदार्थ आहे. हिवाळ्यात बहुतेक घरांमध्ये पराठ्याला प्राधान्य दिले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही देखील तुमच्या घरात खास पराठा बनवू शकता. अनेक पराठ्यांपैकी आज आम्ही तु्म्हाला मलबार पराठा कसा बनवायचा याची रेसिपी सांगणार आहोत. मलबार पराठा करण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी जाणून घेऊया.
पराठा करण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे –
हेही वाचा- तांदळाची भाकरी खाऊन कंटाळा आलाय? तर आता बनवा तांदळाचे खमंग थालीपीठ, पाहा रेसिपी
- गव्हाचे पीठ १ वाटी
- मैदा १ वाटी
- तेल २ मोठे चमचे
- बेकिंग सोडा पाव चमचा
- गरम पाणी कणीक भिजवण्यासाठी
- साखर १ चमचा आणि आवश्यकतेनुसार मीठ
पराठा बनवण्याची कृती –
हेही वाचा- रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय? तर झणझणीत झुणका एकदा बनवाच, जाणून घ्या सोपी रेसिपी
एका पसरट भांड्यात दोन्ही गव्हाचे पीठ, मैदा, बेकिंग सोडा, साखर आणि मीठ एकत्र करा. त्यानंतर तेल टाका आणि थोडे थोडे गरम पाणी टाकत कणीक चांगली भिजवून घ्या. मऊसर पण ताणला जाईल असा कणीकीचा गोळा तयार करा. त्यानंतर एक ओलसर कापड घेऊन ते या गोळ्यावर ठेवून तो तासभर झाकून ठेवा. या कणकेचे ७ ते ८ गोळे करा. त्यातील एक गोळा घेऊन त्याची अतिशय पातळ अशी पोळी लाटून घ्या. आता या पोळीच्या एका बाजूला तेल लावा आणि थोडे कोरडे पीठ भुरभुरा. ही पोळी एका बाजूने घड्या घालून दुमडण्यास सुरू करा.
दुमडून झाली की ती गोलाकार दुमडून घ्या. शेवटचा तुकडा खालून रोलच्या मध्ये दुमडून घ्या. सर्व गोळ्यांचे रोल तयार करून तेही १५ मिनिटे झाकून ठेवा. नंतर तवा गरम करण्यास ठेवा. दुसरीकडे तयार रोल किंचित दाबून हळुवार हाताने पराठा लाटून घ्या आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी पराठा
खरपूस भाजून घ्या.