शुभा प्रभू-साटम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
कॉर्न फ्रिटर म्हणजे मक्याची फिरंगी भजी. अर्थात थोडय़ा वेगळ्या स्वादात.
आणखी वाचा
साहित्य
मक्याचे दाणे उकडून चेचून, उकडून किसलेला बटाटा, आवडत असल्यास किसलेले चीझ (चेडस चीझ असल्यास उत्तम.), मिरपूड, ओरिगनो, बेसिल चुरडून, नसल्यास ड्राय हर्ब्स, किंचित साखर, मीठ, रेड चिली फ्लेक्स. यामध्ये आवडत असेल तर पालक किंवा गाजरही बारीक चिरून अथवा किसून घालता येईल.
कृती
एका भांडय़ात सर्व साहित्य एकत्र करावे. त्याचे चपटे गोळे करावे आणि तव्यावर छान तेलात परतून घ्यावेत. फुटत असतील तर थोडा मैदा, कॉर्नफ्लोअर, ब्रेड कुस्करून घालावा. यामुळे ते मिश्रण मिळून येईल. झाले आपले कॉर्न फ्रिटर तयार.
First published on: 08-11-2018 at 02:09 IST
मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corn fritters recipe for loksatta readers