Corn Upma Recipe : सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी पोहे, उप्पीट खाऊन कंटाळला असाल तर आज आम्ही तुम्हाला हटके रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही नाश्त्यामध्ये ओल्या मक्याचा स्वादिष्ट उपमा बनवू शकता. मका हा पौष्टिक पदार्थ आहे. मक्याचा उपमा कसा बनवायचा, हे जाणून घेऊ या.
साहित्य
सोलून घेतलेला ओला मका
बारीक चिरलेला कांदा
मोहरी
जिरे
हळद
हिंग
मीठ
बारीक चिरलेली मिरचे
बारीक चिरलेली कोथिंबीर
तेल
भाजलेले शेंगदाणे
हेही वाचा : Palak Puri : पौष्टिक पालक पुरी बनवा अन् करा हेल्दी नाश्ता, नोट करा ही रेसिपी
कृती
सोलून घेतलेला ओला मका मिक्सरमधून बारीक करा. खूप बारीक करू नका
गॅसवर कढईत तेल गरम करा
गरम तेलात मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरच्याची तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा टाका
कांदा चांगला परतून घ्या.
त्यानंतर त्यात हिंग, हळद टाका
त्यानंतर यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि भाजलेले शेंगदाणे टाका. चांगले परतून घ्या
त्यानंतर बारीक केलेला मका यामध्ये टाका
आणि सर्व एकत्र मिक्स करा
त्यात थोडे थोडे पाणी शिंपडा
त्यानंतर पाच मिनिटांसाठी कढईवर प्लेट झाकून उपमा शिजू द्या.
ओल्या मक्याचा स्वादिष्ट उपमा तयार होईल.