Corn Upma Recipe in Marathi: आपल्या घरी रोज नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनण्याचा अट्टहास असतो. पण त्यात कांदेपोहे आणि उपमा हे अगदी दर दुसऱ्या दिवशी घरोघरी बनवले जातात. हे दोन्ही पदार्थ सगळेच आवडीने खातात. पण त्यातही तुम्ही ट्विस्ट आणून तुमचा पदार्थ अगदी वेगळा आणि चवदार करू शकता. म्हणूनच आज आपण मक्यापासून उपमा कसा बनवायचा ते जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ या, कॉर्न उपमा रेसिपी…
साहित्य
- 2 मक्याचे कणीस
- 2 टेबलस्पून कांदा
- 1 टेबलस्पून हिरवी मीरची
- 2 टेबलस्पून स्पुन शेंगदाणे
- 1 टेबलस्पून स्पुन डाळिंब दाणे
- 2 टेबलस्पून कोथिंबीर
- 1 टेबलस्पून तेल
- 1/4 टेबलस्पून मोहरी
- 1/2 टेबलस्पून जीरे
- 1 टेबलस्पून उडीद डाळ
- 1/2 लिंबाचा रस
- चवीपुरते मीठ
कृती
प्रथम मका कणिस किसनीने किसुन घ्या.
नंतर पॅनमधे तेल गरम करून मोहरी व जीरे घाला व हिरवी मिरची घाला.
त्यानंतर कडीपत्ता व कांदा घाला. नंतर त्या फोडणी मध्ये कोथिंबीर घाला, छान चव येते.
शेंगदाणे घालून परतून घ्या. नंतर किसलेला मका घाला व चांगले मिक्स करा.
वर झाकन ठेऊन एक चांगली वाफ काढा. नंतर लिंबू रस घालून मिक्स करा.
नोट- ही रेसिपी कुकपॅडवरून घेण्यात आली आहे.