शुभा प्रभू साटम
साहित्य :
* कुसकुस
* आवडीच्या भाज्या
* पनीर
* पाणी
* ऑलिव्ह तेल
* लसूण
* लिंबू रस
* मिरपूड
* मीठ आणि साखर.
कृती
कुसकुसमध्ये कोमट पाणी घालून ते अर्धा तास ठेवा. चांगल्यापैकी फुलून येईल. पाणी कुसकुस बुडेल इतपतच ठेवा. फार घालू नका. चांगले भिजल्यानंतर ते काटय़ाने मोकळे करून ठेवा. त्यात ऑलिव्ह तेल घाला. आता सर्व भाज्या चिरून घ्या. पनीरचे तुकडे करून घ्या. ऑलिव्ह तेल, ठेचलेली लसूण, लिंबाचा रस, मिरपूड, मीठ आणि साखर एकत्र करून व्यवस्थित फेसून घ्या. हे सॅलडचे ड्रेसिंग तयार झाले. भिजवलेले कुसकुस, चिरलेल्या भाज्या आणि पनीर एकत्र करून त्यावर हे ड्रेसिंग ओता. छानपैकी मिसळून सॅलड खायला तयार आहे. तुम्ही या सॅलडवर अक्रोड, भाजलेली अळशी किंवा तीळही पेरू शकता. सजावटही होईल आणि सॅलडला एक कुरकुरीत चवही मिळेल. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही भाज्यांच्या ऐवजी वाफवलेले चिकन किंवा उकडलेली अंडीही वापरू शकता.