दीपा पाटील

साहित्य

१ कपभरून क्रॅब मीट,  अर्धा कप ब्रेडचा चुरा, १ फेटलेले अंडे, पाव चमचे मिरपूड, १ चमचा मेयोनिज, १ चमचा मोहरी पूड, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, अर्धा चमचा सोया सॉस, मीठ, तेल.

कृती

खेकडय़ातील मांस काढून घ्यावे. नंतर त्यात ब्रेडचा चुरा, मिरपूड, मेयोनिज, मोहरी पूड, सोया सॉस घालून चांगले एकत्र करावे. त्यानंतर यात अंडे फेटून टाकावे. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीसाठी मीठ घालून या मिश्रणाचे लिंबाएवढे गोळे करावेत. गरम तेलात ते लालसर तळून काढावे. गरमागरम खेकडा बॉम्ब तयार आहेत.

Story img Loader