कॉर्न तुमचा आवडता असेल आणि तुम्हाला काहीतरी मसालेदार आणि चवदार खायचे असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी करून पाहू शकता. तुम्ही कॉर्न उकळून किंवा भाजून खाल्ले असेल आणि या दोन्ही प्रकारे कॉर्नची चव स्वादिष्ट असते. पण तुम्ही तळलेले मसाला कॉर्न कधी खाल्ले आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतेच मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर कॉर्नची अशीच एक रेसिपी शेअर केली आहे. जर कॉर्न तुमचा आवडता असेल आणि तुम्हाला काहीतरी मसालेदार आणि चवदार खायचे असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी करून पाहू शकता. चवदार तळलेले मसाला कॉर्न बनवण्याची सोपी पद्धत

हेही वाचा – काहीतरी चटपटीत खायचंय? मग झटपट बनवा ‘शेवपुरी सँडविच’; लिहून घ्या साहित्य आणि कृती

साहित्य

  • तळलेले मसाला कॉर्न – आवश्यकतेनुसार कॉर्न
  • २ चमचे आले – लसूण पेस्ट
  • २ चमचे – लिंबाचा रस
  • १ चमचा – काश्मिरी लाल मिरची पावड
  • १/२ चमचा – मीठ
  • १ चमचा – कॉर्नफ्लोअर
  • १/४ कप – वितळलेले लोणी
  • १ चमचा – चाट मसाला
  • हिरवी धणे आणि हिरवी मिरची

हेही वाचा – लाडक्या कृष्णासाठी बनवा दहीकाला! सोपी आणि झटपट तयार होणारी पौष्टिक रेसिपी, लिहून घ्या

मसाला कॉर्न कसा बनवायचा?

  • यासाठी सर्वप्रथम कॉर्नचे तीन समान तुकडे करावेत.
  • आता त्यांना स्टीमरमध्ये ठेवा आणि १५ मिनिटे वाफ करा.
  • एका मोठ्या भांड्यात २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ चमचे लिंबाचा रस, १ चमचे काश्मिरी लाल तिखट आणि १/२ चमचे मीठ घालून चांगले एकजीव करा.
  • यानंतर, वाफवलेले कॉर्न या भांड्यात ठेवा आणि मसाल्यामध्ये चांगले मिसळा.
  • बाऊलमध्ये थोडे कॉर्नफ्लोअर घालून कॉर्नवर चांगले लावून हलवा.
  • आता कढईत तेल तापायला ठेवा. गरम झाल्यावर त्यात तयार कॉर्न टाका आणि हलका तपकिरी होईपर्यंत तळा.
  • एका भांड्यात १/४ कप वितळलेले बटर घ्या, १/२ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर आणि एक चमचा चाट मसाला घाला आणि नीट एकजीव घ्या.
  • तळलेले कॉर्न या भांड्यात ठेवा आणि मसाले लावताना नीट हलवून घ्या.
  • शेवटी भांड्यात ताजी चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला आणि हलवा.
  • तुमचा स्वादिष्ट मसाला कॉर्न तयार होईल.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Craving for a quick bite make instant masala corn at home once you eat it you will keep eating it snk