Crispy corn pakoda recipe: पावसाळा आला की वेध लागतात लोणावळा पिकनिक आणि तिथे मिळणाऱ्या कॉर्न भजीचे. तिथे जाऊन गरमागरम भजी खाणं नेहमी शक्य होईलच असं नाही. अशातच पावसाळ्यात मका हा बाजारात जास्त येतो. मक्याचे खूप प्रकार करता येतात. मका हा पचायला हलका असतो तसेच मक्यामध्ये प्रोटिन्स देखील जास्त प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया कुरकुरीत मक्याची भजी कशी करतात.
मक्याची भजी साहित्य
- २ कप मक्याचे दाणे
- १ कांदा
- कोथिंबीर
- ३-४ हिरव्या मिरच्या
- १/२ इंच आलं
- ३ पाकळ्या लसूण
- १ चमचा चाट मसाला
- १/४ हिंग
- मीठ
- २ मोठे चमचे तांदूळ पिठी
- १/२ कप बेसन
मक्याची भजी कृती
- सर्वप्रथम वाफवलेला मका १ वाटी घ्या त्यातले २ ते ३ चमचे मकी दाणे बाजुला काढुन घ्या.आणि शिल्लक राहिलेला मका मिक्सर मधून जाडसर वाटुन घ्या. आणि बाजुला काढलेला मका त्यात घाला.
- त्यात तांदळाचे पीठ, बेसनपीठ घाला. यानंतर जीरे, ओवा, बारीक चिरलेला कांदा, लाल तिखट, हळद घालुन छान मिक्स करून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून घ्या.
- हे झाल्यानंतर पाणी न घालता छान गोळा मळुन घ्या चवीनुसार मीठ घाला.गॅस वर पॅन ठेवुन तळण्यासाठी तेल टाका.
हेही वाचा – Poha Pakoda Recipe: पावसाळ्यात एन्जॉय करा पोह्यांचे पकोडे, सोपी आणि टेस्टी रेसिपी लगेच नोट करा
- तेल गरम झाले कि मंद गॅसवर छान कुरकुरीत भजी तळुन घ्या.आता गरमागरम कुरकुरीत मका भजी सर्व्ह करा.