पापलेट मासा कसा दिसतो, असं माहित नसणारा माणूस सापडणे कठीण आहे. पापलेट मासा सर्वांनाच खायला आवडतो. याला इंडियन बटर फिश देखील म्हणतात. हा मासा खायला चवदार आहे. पापलेटमध्ये अन्न शोषणासाठी असणारे प्रथिनं खूप मोठ्या प्रमाणात आहेत, तसेच मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री फॅट्टी अॅसिड देखील यात मिळतं. मात्र, आम्ही तुमच्यासाठी आज पापलेटची खास रेसिपी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी भंडारी हळदी पापलेट रेसिपी घेऊन आलो आहेत.

भंडारी हळदी पापलेट साहित्य

पापलेट
ताजे नारळ किस 1वाटी
४ /५ मिरची
थोडी कोथिंबीर
४/५ लसून पाखली
१ चमचा हळदी
७/८ काजु
२ चमचा तेल
चवी प्रमाणे मीठ

भंडारी हळदी पापलेट कृती

१. सर्वात आधी पापलेट स्वच्छ करा त्याला मध्ये काप करा आणि तेल सोडून वर दिलेले सर्व साहित्य ग्राइंडर मिक्सरमध्ये घाला.

२. गॅसवरील पात्र स्टोव्हवर गरम करून मग त्यात तेल घाला.

३. मिक्सरमध्ये व्यवस्थित मिसळलेले घटक त्या गरम तेलात टाका.

४. एकदा मिश्रण व्यवस्थित उकळले की त्यात मासे घाला

५. एकदा तुम्हाला दिसेले की मासे ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित शिजला आहे.

हेही वाचा >> ऑईल फ्री फिश करी; एकदा खाल खातच रहाल, ही घ्या सोपी मराठी रेसिपी

६. अशाप्रकारे भंडारी हळदी पापलेट तयार आहे.