French Fries Recipe : फ्रेंच फ्राइज हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. सहसा आपण फ्रेंच फ्राइज बाहेर खातो. पण तुम्हाला माहिती आहे का फ्रेंच फ्राइज घरी बनविणे, खूप सोपी आहे. फक्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही कुरकुरीत फ्रेंज फ्राइज घरी बनवू शकता. जर तुम्हाला फ्रेंच फ्राइज खायला आवडत असेल तर ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.
साहित्य
- बटाटे
- मीठ
- पाणी
- तेल
- तिखट
- मीठ
- चाट मसाला
हेही वाचा : Chinese Veg Fried Rice : घरीच बनवा स्ट्रीट स्टाइल चायनिज व्हेज फ्राइड राइस, सोपी रेसिपी लगेच नोट करा
कृती
- सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या
- त्यानंतर बटाटे जाडसर लांब कापावेत.
- सर्व कापलेले बटाटे स्वच्छ पाण्यात धुवून घ्या.
- त्यानंतर कढईत पाणी गरम करा
- पाणी गरम झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला.
- मीठ घातलेल्या गरम पाण्यात स्वच्छ धुतलेले बटाट्याचे काप टाका.
- लक्ष द्या, पाण्याला उकळी येऊ नये.
- दोन तीन मिनिटे कढईवर झाकण ठेवून बटाट्याचे काप चांगले शिजवा.
- त्यानंतर शिजवलेले बटाट्याचे काप सुती कापडावर टाका.
- कोरडे झाल्यानंतर बटाट्याचे काप मंद आचेवर लाल रंग येईपर्यंत तळून घ्या.
- तळलेल्या फ्रेंच फ्राइजवर चवीनुसार तिखट आणि मीठ घाला.
- थोडा चाट मसाला टाका आणि सर्व मिश्रण एकत्र करा.
- त्यानंतर फ्रेंच फ्राइज तुम्ही सर्व्ह करू शकता.