सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू आहे. या काळात पितरांची पुजा केली जाते. त्यांना नैवद्य दाखवला जातो. पितृपक्षाच्या नैवद्यासाठी अनेक पदार्थ बनवले जातात. प्रत्येक पदार्थाला विशेष महत्त्व असते. पितृपक्षाच्या थाळीत घोसाळ्याची भजी केली जाते. तुम्हाला माहिती आहे का घोसाळ्याची भजी कशी बनवतात?आज ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- घोसावळे
- बेसन
- तांदळाचे पीठ
- लाल तिखट
- जिरे
- ओवा
- हळद
- मीठ
- तेल
कृती
- सुरुवातीला घोसावळे सोलून घ्या
- त्यानंतर यांच्या गोल चकत्या करा
- एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, जिरे, ओवा, हळद मीठ घाला
- त्यात पाणी घालून घट्ट मिश्रण करा
- कढईत गरम तेल करा
- घोसावळ्याच्या चकत्या मिश्रणात बुडवून गरम तेलामध्ये सोडा.
- मंद आचेवर ही भजी कुरकुरीत तळून घ्या