मंच्युरियन हा शब्द जरी ऐकला तरी तोंडाला पाणी सुटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मंच्युरियन खायला आवडतात. आपण सहसा बाहेरचे मंच्युरियन खूप आवडीने खातो पण अनेकदा अस्वच्छतेमुळे बाहेरचे मंच्युरियन खाल्ल्यामुळे आजारी पडण्याचा धोका जास्त असतो.
लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेताना तुम्ही घरीच त्यांच्यासाठी कुरकुरीत मंच्युरियन बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

  • कोबी
  • मैदा
  • कांदापात
  • ढोबळी मिरची
  • गाजर
  • लाल तिखट
  • पांढरी मिरी पावडर
  • गरम मसाला
  • आल लसूण पेस्ट
  • लसूण
  • तेल
  • मीठ

हेही वाचा : Masala Omelette : मसाला ऑम्लेट कसं बनवायचं? नोट करा ही सोपी रेसिपी

कृती

मंच्युरियन

  • सुरुवातीला कोबी, कांदापात, गाजर आणि ढोबळी मिरची बारीक चिरुन घ्यावी.
  • या चिरलेल्या भाज्यांमध्ये मैदा, लाल तिखट, गरम मसाला, पांढरी मिरी पावडर, आल लसूण पेस्ट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे.
  • हे मिश्रण भज्यांप्रमाणे भिजवून घ्यावे
  • गरम तेलात मंच्युरियन तळावेत.

शेजवान चटणी

  • शेजवान चटणी बनवण्यासाठी लसूण सोलून बारीक चिरून घ्यावे.
  • बारीक चिरलेले लसूण गरम तेलात परतून घ्यावे
  • त्यात मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ टाकावे.
  • हे मिश्रण चटणी प्रमाणे चांगले घट्ट झाले की गॅस बंद करावा.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crispy manchurian recipe how to make manchurian at home note down easy recipe street food manchurian lovers chinese food news ndj
Show comments