Crispy Paneer Bites Recipe: पनीर टिक्का, क्रिस्पी पनीर आणि पनीरच्या अशाच अनेक रेसिपी तुम्ही अनेकदा ट्राय केल्याच असतील. अनेकदा घरीही आपण पनीरच्या अनेक डिशेस बनवतो. लहानग्यांपासून मोठ्यापर्यंत सगळेच पनीर अगदी आवडीने खातात. पनीरच्या स्टार्टरपासून ते मेन कोर्सपर्यंत आवडीने खाणारे खव्वये अनेक आहेत. पण आपल्याला सगळेच पदार्थ घरी बनवणं जमत नाही. म्हणून आज आपण घरच्या घरी झटपट बनेल अशी सगळ्यांच्या आवडीची पनीरची रेसिपी जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे ‘क्रिस्पी पनीर बाईट्स’.

हेही वाचा… रोज त्याच त्याच प्रकारचा समोसा खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा ‘फ्लॉवर समोसा रेसिपी’

साहित्य

२०० ग्रॅम पनीर

१ चमचा लाल मिरची पावडर

½ चमचा मीठ

½ चमचा धने पावडर

आले-लसूण पेस्ट

कॉर्नफ्लोर

मैदा

हेही वाचा… साबुदाण्याची नवी रेसिपी! ‘क्रिस्पी साबुदाणा बॉल्स’ आजच करा ट्राय, वाचा साहित्य आणि कृती

कृती

१. प्रथम एका भांड्यात २०० ग्रॅम पनीर घ्या. त्याचे तुकडे करा.

२. त्यात १ चमचा लाल मिरची पावडर, ½ चमचा मीठ, ½ चमचा गरम मसाला, ½ चमचा धने पावडर आणि आले-लसूण पेस्ट घाला.

३. सगळं मिश्रण एकत्र करा आणि १० मिनिटं बाजूला ठेवा.

४. याला स्लरीमध्ये बुडवा.

५. २ चमचे कॉर्नफ्लोर, १ चमचा मैदा आणि पाण्याचं मिश्रण करून स्लरी तयार करा.

६. स्लरीमध्ये बुडवल्यानंतर आता एक एक करून याला ब्रेड क्रंब्सने कोट करा.

७. मध्यम-उच्च आचेवर तळा.

८. तुमचा क्रिस्पी पनीर तयार आहे. मजा घ्या!