Crispy Sabudana Balls Recipe: साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे आपण अनेकदा ट्राय केले असतील. उपवास असला की आधी साबुदाण्याची आठवण येते. अगदी चविष्ट लागणाऱ्या या साबुदाण्याची खिचडी आणि वडे सोडले तर त्यापेक्षाही काही वेगळे पदार्थ खूप कमी लोकांनी ट्राय केले असतील. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया क्रिस्पी साबुदाणा बॉल्सची रेसिपी.
हेही वाचा… ‘ब्रेड पोटॅटो बाइट्स’ रेसिपी कधी ट्राय केलीय का? एकदा खाल तर खातच रहाल
साहित्य
१ कप साबुदाणा (भिजवलेले)
१ चिरलेली हिरवी मिरची
½ चमचा मीठ
½ चमचा धने पावडर
½ चमचा गरम मसाला
१ चमचा काश्मीरी लाल मिरची
कोथिंबीर
ब्रेड क्रंब्स
कॉर्नफ्लोर
मैदा
कॉर्नफ्लेक्स
हेही वाचा… कुरकुरीत ‘पकोडा रोल बाईट्स’ कधी खाल्ल आहे का? मग वाचा ही सोपी रेसिपी
कृती
१.एका भांड्यात १ कप भिजवलेले साबुदाणा घ्या.
२. त्यात २ उकडलेले बटाटे, १ चिरलेली हिरवी मिरची, ½ चमचा मीठ, ½ चमचा धने पावडर, ½ चमचा गरम मसाला, १ चमचा काश्मीरी लाल मिरची, ब्रेड क्रंब्स, आणि कोथिंबीर घाला. हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.
३. आता या मिश्रणाचे छोटे छोटे बॉल्स तयार करा.
४. हे बॉल्स स्लरीमध्ये बुडवा.
५. कॉर्नफ्लोर, मैदा आणि पाण्याचं मिश्रण करून स्लरी तयार करा.
६. मग ते कॉर्नफ्लेक्समध्ये घोळून घ्या.
७. सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तळा.
८. तुमचे कुरकुरीत साबुदाणा बॉल्स तयार आहेत.
ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.