Shravan 2023: हा श्रावण महिना भगवान शिवशंकराला समर्पित केला जातो. भगवान शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते, उपवास केला जातो. या श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खायचं, हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय. तुम्ही कधी उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ ट्राय केले का? चला तर स्पेशल उपवसाचे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘उपवासाचे थालीपीठ’ बनवण्यासाठी लागणारे साहित्य –

  • उकडलेले बटाटे – २
  • भाजलेला साबुदाणा – २ वाटी
  • भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट – १ वाटी
  • हिरव्या मिरच्या – ५ ते ६
  • तूप किंवा तेल – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार

‘उपवासाचे थालीपीठ’ बनवण्याची कृती –

  • ‘उपवासाचे थालीपीठ’ बनवण्यासाठी सर्वात आधी उकडलेला बटाटा बारीक खिसावा.
  • मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घ्याव्या.
  • भाजलेला साबुदाणा , शेंगदाण्याचे कूट, वाटलेल्या मिरच्या, खिसलेला बटाटा , चवीनुसार मीठ एकत्र करावे.
  • तयार झालेल्या मिश्रणात लागेल तसे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ मळल्यानंतर ते थालीपीठाप्रमाणे थापून घ्यावे.
  • एकीकडे गॅसच्या मध्यम आचेवर तवा तापत ठेवावा. तवा तापल्यानंतर त्यात तेल किंवा तूप घालावे.
  • थापलेले थालीपीठ झाकण ठेऊन मध्यम आचेवर भाजून घ्यावे. त्यानंतर पाच मिनिटांनी झाकण काढून थालीपीठ दुसऱ्या बाजूला करावे.

हेही वाचा >>श्रावणी शनिवार: उपवासासाठी करा खास ‘केळीची खीर’, लगेच नोट करा टेस्टी रेसिपी

  • तयार झालेले थालीपीठ दह्यासोबत चविष्ट लागते.
मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crispy sago thalipeeth how to make upvasachya bhajniche thalipeeth upvasache thalipeeth recipe in marathi srk
Show comments