Crispy Twister Recipe: बटाट्याचे काप, बटाट्याची भजी अशाप्रकारचे अनेक पदार्थ तुम्ही ट्राय केले असतील. पण कधी तुम्ही घरच्या घरी बटाट्याचे क्रिस्पी ट्विस्टर्स करून पाहिले आहेत का? आज आपण क्रिस्पी ट्विस्टर रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
बटाटे
पाणी
१ टेबलस्पून कश्मिरी मिरची
१ टेबलस्पून मीठ
अर्धा कप कॉर्नफ्लोर
हेही वाचा… Crunchy Potato Kachori: बटाट्याची खुसखुशीत कचोरी कधी खाल्ली आहे का? मग रेसिपी पटकन वाचा
रेसिपी
- बटाटे सोलून त्यांचे तुकडे करा आणि १५ मिनिटे पाण्यात ठेवा.
- एक कप पाणी, १ टेबलस्पून कश्मिरी मिरची, १ टेबलस्पून मीठ आणि अर्धा कप कॉर्नफ्लोर घेऊन ते चांगले मिक्स करा.
- आता व्हिडीओत दाखवल्या प्रमाणे स्पायरल तयार करा.
- स्पायरल केलेल्या बटाट्याच्या तुकड्याला या मिश्रणात बुडवून मध्यम आचेवर तळा.
- तुमचा क्रिस्पी ट्विस्टर तयार आहे. आनंद घ्या!
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.
े