Crunchy Potato Burger Recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी सगळ्यांच्या आवडीची आहे, चला तर मग जाणून घेऊया ‘पोटॅटो बर्गर’ची रेसिपी.

साहित्य

२ उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे

Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Paneer malai kofta recipe easy paneer recipe video
१०० ग्रॅम पनीरपासून बनवा घरच्या घरी ‘पनीर मलाई कोफ्ता’, रेस्टॉरंटची चव विसरून जाल
chana chat recipe
चमचमीत खायचं मन करतंय? मग या सोप्या पद्धतीने बनवा ‘चना चाट’, लिहून घ्या साहित्य आणि कृती
potato lifafa recipe
बटाट्याची नवीन रेसिपी ट्राय करायचीय? मग ‘पोटॅटो लिफाफा’ एकदा करून पाहाच, लगेच लिहून घ्या रेसिपी
Misal Pav Recipe
Misal Pav Recipe : कुकरमध्ये अशी बनवा झणझणीत मिसळ पाव, रेसिपी जाणून घेण्यासाठी VIDEO एकदा पाहाच
Egg Korma Recipe
Egg Korma Recipe: नॉनव्हेज प्रेमींना हमखास आवडेल अशी झणझणीत ‘अंडा कोरमा रेसिपी’, लगेच लिहून घ्या साहित्य आणि कृती
Makar Sankranti special Tilgul Poli Recipe In Marathi Til poli recipe in marathi
हिवाळ्यात आरोग्यासाठी बेस्ट डिश, १० मिनिटांत बनवा तिळाची पोळी; घ्या सोपी रेसिपी

चिरलेली हिरवी मिरची

१ चमचा चिली फ्लेक्स

१ चमचा ऑरिगॅनो

१ चमचा मीठ

१ चमचा गरम मसाला

कोथिंबीर

ब्रेड

टोमॅटो केचप

चीज

२ चमचे कॉर्नफ्लोर

१ चमचा मैदा

हेही वाचा… Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी

कृती

  1. एका वाडग्यात २ उकडलेले आणि मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात चिरलेली हिरवी मिरची, १ चमचा चिली फ्लेक्स, १ चमचा ऑरिगॅनो, १ चमचा मीठ, १ चमचा गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
  2. सर्व मिश्रण छान एकजीव करा.
  3. एक ब्रेड स्लाईस घ्या आणि त्याचे वर्तुळाकार तुकडे करा.
  4. त्यावर टोमॅटो केचप आणि चीज लावा.
  5. आता दोन्ही वर्तुळाकार ब्रेड स्लाईस एकमेकांवर ठेवा आणि थोडं दाबा म्हणजे तो चिकटेल.
  6. बटाट्याचं मिश्रण घ्या आणि या बर्गरला त्याने कोटिंग करा.
  7. आता स्लरीमध्ये हा बर्गर बुडवा. स्लरी तयार करण्यासाठी २ चमचे कॉर्नफ्लोर, १ चमचा मैदा आणि पाणी घ्या.
  8. स्लरीनंतर बर्गर ब्रेड क्रंब्सने कोट करा.
  9. मध्यम आचेवर तळा.
  10. तुमचा पोटॅटो बर्गर तयार आहे. आनंद घ्या!

हेही वाचा… १०० ग्रॅम पनीरपासून बनवा घरच्या घरी ‘पनीर मलाई कोफ्ता’, रेस्टॉरंटची चव विसरून जाल

पाहा VIDEO

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader