Crunchy Potato Finger Recipe: बटाट्याचे अनेक पदार्थ आपण अनेकदा ट्राय केलं असतील. फ्रेंच फ्राईज, बटाट्याचे काप, बटाट्याची भजी असे अनेक पदार्थ अगदी काहीच मिनिटांत आपण घरच्या घरी बनवत असतो. पण नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा येतो आणि काहीतरी वेगळं खायचं मन करतं. पण नवीन गोष्टी ट्राय करायच्या म्हटल्या तर त्यात खूप वेळही जातो. पण आपण एक अशी रेसिपी जाणून घेणार आहोत जी झटपट तर तयार होतेच आणि क्रिस्पी, चवदारही होते. चला तर मग जाणून घेऊया क्रंची पोटॅटो फिंगर्सची रेसिपी.
हेही वाचा… पनीरची नवी रेसिपी! झटक्यात करा ‘क्रिस्पी पनीर बाईट्स’, एकदा खाल तर खातच रहाल
साहित्य
२ उकडलेले बटाटे
१/२ चमचा लाल मिरपूड
१/२ चमचा मीठ
१ चमचा धने पावडर
१/२ चमचा गरम मसाला
१/२ चमचा ओरेगनो
मिरची
कॉर्नफ्लोर
हेही वाचा… रोज त्याच त्याच प्रकारचा समोसा खाऊन कंटाळलात? मग ट्राय करा ‘फ्लॉवर समोसा रेसिपी’
कृती
१. २ उकडलेले बटाटे एका भांड्यात घ्या.
२. त्यात १/२ चमचा लाल मिरपूड, १/२ चमचा मीठ, १ चमचा धने पावडर, १/२ चमचा गरम मसाला, १/२ चमचा ओरेगनो आणि मिरचीचे तुकडे, हे सर्व मिश्रण चांगले मिसळा आणि त्यात २-३ चमचे कॉर्नफ्लोर घाला.
३. आता हे स्टफिंग घेऊन त्याला स्टिकसारखे आकार द्या.
४. स्टिकला मध्यम आचेवर तळा जोपर्यंत तो सोनेरी तपकिरी होत नाही.
५. तुमचे बटाट्याचे स्टिक तयार आहेत. सर्वांनी आनंद घ्या!
ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.