Crunchy Potato Kachori: नववर्षाला सुरूवात झाली आहे. तसंच खव्वयेप्रमींना नवनवीन रेसिपी ट्राय करण्याचीही उत्सुकता वाढली आहे. रोज नाश्त्याला काय बनवायचं, हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. पण कमीतकमी वेळेत नेमकं काय करायचं हेदेखील कळत नाही. म्हणून आज आपण एक नवीन रेसिपी जाणून घेणार आहोत. जी क्रिस्पीदेखील आहे आणि चवदारदेखील. आज आपण जाणून घेणार आहोत, क्रंची पोटॅटो रेसिपी.

साहित्य

हिरव्या मिरच्या

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Make Kabuli Chana Kebabs in just a few minutes
अवघ्या काही मिनिटांत बनवा काबुली चन्याचे कबाब; वाचा साहित्य आणि कृती
How To Make Matar Kachori At Home Matar Kachori recipe in marathi
थंडीत बनवा क्रिस्पी चटपटी मटर कचोरी! चहासोबत खासच लागते मटार कचोरी; नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
Ragi Biscuits recipe
मैद्याचे बिस्किट सोडा मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक नाचणीचे बिस्कीट; वाचा साहित्य आणि रेसिपी
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
Gajar Rabdi Recipe,
थंडीच्या दिवसात बनवा गरमागरम ‘गाजर रबडी’, रेसिपी वाचूनच तोंडाला सुटेल पाणी, लिहून घ्या सोपी साहित्य आणि कृती

१ टे.स्पून जीरं

१ कापलेला कांदा

१ टे.स्पून काश्मिरी लाल मिरची

अर्धा टे.स्पून हळद

अर्धा टे.स्पून धणे पूड

मीठ

अर्धा टे.स्पून गरम मसाला

२ उकडलेली आणि मॅश केलेली बटाटी

हिरवी कोथिंबीर

१ वाटी मैदा

२ टे.स्पून तेल

मैद्या

हेही वाचा… Crispy Peas Triangle: नववर्षाच्या सुरूवातीला ट्राय करा मटारची ‘ही’ नवीकोरी रेसिपी, साहित्य आणि कृती घ्या लिहून

कृती

  1. स्टफिंगसाठी: एका पातेल्यात कापलेल्या हिरव्या मिरच्या, १ टे.स्पून जीरं आणि १ कापलेला कांदा घाला. त्याला चांगलं भाजून घ्या. मग त्यात १ टे.स्पून काश्मिरी लाल मिरची, अर्धा टे.स्पून हळद, अर्धा टे.स्पून धणे पूड, अर्धा टे.स्पून मीठ आणि अर्धा टे.स्पून गरम मसाला घाला.
  2. त्यात २ उकडलेली आणि मॅश केलेली बटाटी आणि थोडी हिरवी कोथिंबीर घाला.
  3. पिठासाठी: एका भांड्यात १ वाटी मैदा, अर्धा टे.स्पून मीठ, २ टे.स्पून तेल आणि पाणी घाला. मऊ पीठ मळा.
  4. त्यातल्या पिठाने पोळीचा आकार द्या आणि थोडे तेल लावून, मैद्या लावून, लाटून घ्या.
  5. आता त्यात स्टफिंग भरा आणि व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे कचोरीसारखं फोल्ड करा.
  6. जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत ते कमी आचेवर तळा.
  7. तुमची कुरकुरीत आलू कचोरी तयार आहे.

हेही वाचा… Bread Potato Balls Recipe: यंदा ३१ होईल खास! घरच्या घरी बनवा ‘ब्रेड पोटॅटो बॉल्स’; एकदा खाल तर खातच राहाल

पाहा व्हिडीओ

*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.

Story img Loader