Cucumber raita recipe: बुंदी रायता खायला अनेकांना आवडतो. परंतु, तुम्ही कधी काकडी रायता ट्राय केला आहे का? काकडी रायता बनवायला एकदम सोपा आणि पटकन होणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया काकडी रायता बनवण्याची सोपी रेसिपी…
काकडी रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी दही
- १ मोठी काकडी
- १ चमचा जिरे पूड
- २ चमचे लाल तिखट
- मीठ चवीनुसार
काकडी रायता बनवण्याची कृती:
हेही वाचा: चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
- सर्वात आधी काकडी किसून घ्या. काकडी किसून झाल्यानंतर कापड घेऊन त्यातील रस काढून घ्या.
- आता एका भांड्यामध्ये किसलेली काकडी ठेऊन त्यात मीठ घाला.
- त्यानंतर काकडीप्रमाणे दह्यातील जास्तीचे पाणीसुद्धा काढून घ्या.
- आता एका भांड्यात दही, काकडी, जिरे पूड आणि लाल तिखट चवीनुसार मीठ इत्यादी घालून मिक्स करून घ्या.
- तयार काकडी रायत्याचा जेवणाबरोबर आस्वाद घ्या.