ज्योती चौधरी-मलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साहित्य

२ काकडय़ा, १ राजेळी केळं, अर्धी वाटी दही, २ हिरव्या मिरच्या, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा मोहरी, थोडी साखर, थोडी कोथिंबीर.

कृती –

प्रथम काकडी किसून घ्यावी, केळं बारीक कापून घ्यावं. मोहरी, साखर व मिरच्या एकत्र वाटून घ्याव्यात. आता सगळे पदार्थ एकत्र करा व त्यात चवीप्रमाणे मीठ घालून मिश्रण नीट एकत्र करा. नंतर पानात वाढावे.

सध्या उन्हाळ्यात शरीरात उष्णता वाढते त्यासाठी जेवणात काकडी, केळं, ताक या पदार्थाचा जरूर वापर करा.

मराठीतील सर्व कुटुंबकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cucumber salad cucumber salad recipe