आपल्यापैकी बरेच लोक खवय्ये असतात ज्यांना वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायला फार आवडतो. काही खवय्ये असे असतात ज्यांना बाहेरचे चमचचमीत आणि मसालेदार पदार्थ खायला आवडात तर काही खवय्ये असे असतात की ज्यांना घरगुती पदार्थच जास्त आवडताता. तुम्ही कोणत्या प्रकराचे खवय्ये आहात? तुम्ही जर घरगुती पदार्थ आवडीने खात असाल तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक रेसिपी आहे. तुम्हाला वांगे खायला आवडत असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते. तुम्ही आता पर्यंत वांग्याचे रस्सा, भरलेले वांग, आणि वांग्याचे भरीत असे पदार्थ खाल्ले असतील पण तुम्ही कधी दहयातले वांग्याचे भरित खाल्ले आहे का? नसेल तर ही रेसिपी एकदा करुन पाहा.
दह्यातले वांग्याचे भरीत रेसिपी
साहित्य
भरताचे वांगे १, कांदा १ बारीक चिरून, हिरवी मिरची २ बारीक चिरून, घट्ट दही १ वाटी, मोहरी अर्धा चमचा, हिंग १ चिमूट, मीठ आणि साखर चवीप्रमाणे, कोथिंबीर अर्धी वाटी बारीक चिरलेली, तेल २-३ चमचे
हेही वाचा- आमरस, लोणचं खाऊन कंटाळला असाल तर आंब्याचे रायते खाऊन पाहा, जाणून घ्या सोपी रेसिपी
कृती
वांग्याला तेल लावून गॅसवर जाळी ठेवून त्यावर नीट भाजून घ्या. थंड झाल्यावर त्याची साले काढून एका भांडय़ामध्ये कुस्करून त्यात कांदा, मिरची, मीठ, साखर घालून एकत्र करा. त्यात घुसळलेले दही आणि कोथिंबीर घाला. नीट एकत्र करून हिंग आणि मोहरीची फोडणी त्यावर घाला. झाकून ठेवा म्हणजे फोडणी त्यात नीट मुरेल. वाढताना पुन्हा वरुन कोथिंबीर घाला.
टीप – फोडणी न देतादेखील हे भरीत अतिशय चविष्ट लागते.