Dabeli Recipe: एखाद्या रेस्टॉरंटमध्ये चविष्ट असलेली दाबेली आपण अनेकदा मेन्यूमध्ये पाहतो. बाहेर आपण ती अतिशय आवडीने खातो. पण दाबेली कधी तुम्ही घरी बनवायचा प्रयत्न केलाय का?
दाबेली अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते. त्याला जास्त वेळही लागत नाही आणि कष्टही लागत नाहीत. मग चमचमीत दाबेलीची रेसिपी जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का? चला तर मग पाहू या दाबेलीची सोपी रेसिपी.
साहित्य
२-३ टेबलस्पून तेल
१ टीस्पून काश्मिरी लाल मिरची
१/२ टेबलस्पून हळद पावडर
१/२ टेबलस्पून धने पावडर
१/२ टेबलस्पून मीठ
२ टेबलस्पून दाबेली मसाला
बटाटे (उकळून मॅश केलेले)
इमली चटणी
मसाला शेंगदाणे
पाव
लसूण चटणी
कांदा (बारीक चिरलेला)
शेव
हेही वाचा… गरमागरम, कुरकुरीत खायचंय? मग ‘क्रिस्पी ब्रेड रोल’ एकदा ट्राय कराच, वाचा सोपी रेसिपी
कृती
१. एका पातेल्यात २-३ टेबलस्पून तेल गरम करा. त्यात १ टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची, १/२ टेबलस्पून हळद पावडर, १/२ टेबलस्पून धने पावडर, १/२ टेबलस्पून मीठ आणि २ टेबलस्पून दाबेली मसाला घाला.
२. याला चांगले भाजून घ्या, मग पाणी घालून त्यात उकळून आणि मॅश केलेला बटाटा घाला.
३. सगळं मिश्रण एकत्र करा आणि २ टेबलस्पून इमली चटणी आणि मसाला शेंगदाणे घाला.
४. एका पावाला मधून ओपन करा आणि इमली चटणी, लसूण चटणी, दाबेली स्टफिंग, चिरलेला कांदे आणि मसाला शेंगदाणा घाला.
५. त्यानंतर हा पाव बटरमध्ये सर्व बाजूंनी भाजून घ्या.
६. सगळ्यात शेवटी चिरलेला कांदा, शेव आणि मसाला शेंगदाणे हे पावावर शिवरून घ्या.
७. तुमची चविष्ट दाबेली तयार आहे.
ही रेसिपी @khanaPeenaRecipes या युट्यूब चॅनलवरून घेण्यात आली आहे.