Dahi Kabab Recipe: नेहमी ब्रेकफास्ट किंवा संधाकाळच्या नाश्त्याला काय बनवावं हा प्रश्न पडतो. झटपट आणि चविष्ट बनेल अशा रेसिपीच्या अनेकजण शोधात असतात. आज आपण झटपट होईल आणि अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी जाणून घेणार आहोत. ज्याचं नाव आहे, ‘दही कबाब रेसिपी’.
दही कबाब साहित्य
ग्रीक योगर्ट
१ उकडलेला आणि किसलेला बटाटा
४० ग्रॅम किसलेलं पनीर
१ चिरलेली कांदा
अर्धी चिरलेली शिमला मिरची
हिरवी मिरची
उकडलेले स्वीट कॉर्न
१ चमचा लाल मिरची पावडर
अर्धा चमचा मीठ
अर्धा चमचा धणे पावडर
अर्धा चमचा गरम मसाला
१ चमचा कॉर्नफ्लोर
ब्रेड क्रंब्स
हेही वाचा… संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा ‘क्रिस्पी चिली गार्लिक बाईट्स’; लहान मुलंही आवडीने खातील
दही कबाब कृती
१. प्रथम अर्ध्या भांड्यात ग्रीक योगर्ट (त्रिशंकू दही) १ उकडलेला आणि किसलेला बटाटा, ४० ग्रॅम किसलेलं पनीर, १ चिरलेली कांदा, अर्धी चिरलेली शिमला मिरची, हिरवी मिरची आणि उकडलेले स्वीट कॉर्न घ्या.
२. त्यात १ चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला घाला.
३. त्यानंतर यात १ चमचा कॉर्नफ्लोर घाला आणि सर्व पदार्थ चांगले मिक्स करा.
४. हातावर तेल लावून हवा तसा आकार देऊन गोळा तयार करा.
५. त्याला ब्रेड क्रंब्समध्ये घोळून घ्या.
६. त्यानंतर ते मध्यम आचेवर तळा.
७. तुमचा दही कबाब तयार आहे.
पाहा VIDEO
*ही रेसिपी @khana_peena_recipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घेण्यात आली आहे.