Dahi Sabudana : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला महिला हरतालिकेचा व्रत करतात. या दिवशी महिला दिवस रात्र उपवास करतात. उपवासाला सहसा साबुदाणा खिचडी बनवली जाते पण तुम्ही साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळला असाल तर दही साबुदाणा बनवू शकता. दही साबुदाणा कसा बनवायचा, यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घेऊ या.
साहित्य
- साबुदाणा
- ताक
- हिरव्या मिरच्या
- शेंगदाण्याचा कूट
- दही
- जिरे
- मीठ
- साखर
हेही वाचा : Puran Poli : पुरण पोळी फुटण्याची भीती वाटते? टेन्शन घेऊ नका, या टिप्स फॉलो करा अन् नोट करा ही सोपी रेसिपी
कृती
- साबुदाणा पाण्यात एक तासासाठी भिजू द्यावा.
- नंतर एका भांड्यात त्यातील पाणी काढावे
- १ तासाने त्यात ताक टाकावे
- आणि पुन्हा साबुदाणा ४ ते ५ तास भिजू द्यावा
- एका कढईत तेल गरम करावे.
- त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्याची फोडणी करावी.
- ही फोडणी भिजवलेल्या साबुदाण्यावर टाकावी
- त्यात वरुन दाण्याचा कूट, मीठ आणि चवीप्रमाणे साखरही घालावी.
- त्यात दही घालावे आणि साबुदाणा चांगला परतून घ्यावा म्हणजे सर्व मिश्रण एकत्र करता येईल.
- हा दही साबुदाणा तुम्ही सर्व्ह करू शकता.