होळी रे होळी, पुरणाची पोळी.. हे गाणं आपल्या सर्वांच्याच लक्षात आहे, नाही का? दरवर्षी होळीला (Holi fFestival) खास बनवले जाणारे पदार्थ आठवले ना, की तोंडाला पाणी सुटतं..आज आम्ही तुमच्यासाठी होळीनिमित्त रंगीबिरंगी दहीवडे रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग पाहुयात याची रेसिपी..
पौष्टीक दहीवडे
- २ कप उडदाची डाळ
- १ कप मुगाची डाळ
- ४-५ हिरवी मिरची
- ८-१० कढीपत्त्याची पाने
- १ टेबलस्पून जीरे
- थोडी कोथिंबीर
- १ इंच अद्रकाची तुकडे
- ६-७ लसणाच्या पाकळ्या
- १ टेबलस्पून धना जिरा पावडर
- १ टेबलस्पून लाल तिखट
- १/२ टेबलस्पून हळद
- चवीनुसार मीठ
- १/२ किलो दही
- चवीनुसार साखर
- चाट मसाला
- आवश्यकतेनुसार पाणी
- तळण्यासाठी तेल
पौष्टीक दहीवडे कृती
- उडीद आणि मुगाची डाळ कमीतकमी सात ते आठ तास भिजवत ठेवा.
- सात ते आठ तासानंतर डाळी भिजल्यावर चाळणीत पाणी निथळण्यासाठी ठेवावी त्यानंतर डाळी मिक्सरच्या भांड्यात घालावे त्यात लसन अद्रक हिरवी मिरची जीरे कढीपत्त्याची पाने कोथिंबीर घालावी व पाणी न टाकता मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावी.
- आता या वाटलेल्या डाळीला हाताने खूप छान फेटून घ्यावे नंतर त्यात तिखट मीठ हळद धना जिरा पावडर टाकून मिश्रण छान मिक्स करून घ्यावे नंतर कढईत तेल घालून गॅस वर ठेवावे व वाटलेल्या डाळीचे पाण्याचा हात लावून छोटे छोटे गोळे कढईत टाकून वडे तयार करून घ्यावे.
- पाणी न घातला या डाळी वाटून घ्या. त्यात मीठ टाका. घट्ट दही, पाणी टाकून त्याचे जाडसर ताक करा. त्यात साखर, मीठ आणि आल्याची पेस्ट टाका.
- दह्याचे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा. कढईत तेल गरम करून वडे तळा. तळलेले वडे लगेच थंड पाण्यात घाला. वड्यातील पाणी निथळून घ्या आणि ते थंडगार ताकात भिजत ठेवा. त्यात होळीनिमित्त रंगेबेरंगी दहीवडे खायचे असतील तर त्यात खायचा कलर टाकू शकता.
हेही वाचा >> उन्हाळ्यात लहान मुलांसाठी बनवा थंडगार ‘चिकू मिल्कशेक’; पाहा सोपी रेसिपी
- मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा आणि दोन तासांनी वडे पाण्यात टाका नंतर वडे निथळून घ्यावे. प्लेटमध्ये टाकून त्यावर दही टाकावे आवडीनुसार मीठ लाल मिरची पावडर चाट मसाला घालावा दहिवडे सर्व्ह करावे.