Monsoon Recipe : पावसाळ्यातील वातावरण हे अतिशय थंडावा देणारे आणि अल्हाददायक असते. या वातावरणात गरमारगम चहासोबत काहीतरी मसालेदार खाण्याची ईच्छा अनेकदा होते. मात्र पावसामुळे बाहेर जाता येत नाही. अशा वेळी घरातल्या घरात निवांत खिडकीत बसून पाऊस पाहत चहासोबत मसालेदार आणि खमंग काहीतरी खायला मिळावे असे अनेकांना वाटते. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव आहे, खमंग डाळ कचोरी. चला तर मग पाहुयात कशी करायची ही रेसिपी.
डाळ कचोरीचे साहित्य
- तुम्हाला २ कप ऑल पर्पज मैदा, ४ ते ५ चमचे रिफाइंड तेल
- तूप – २ चमचे, भिजवलेली उडीद डाळ – २ वाटी
- कसुरी मेथी पावडर १ चमचे, लाल तिखट २ चमचे
- जिरे पावडर चमचे, धणे पावडर – २ चमचे लागेल
- बडीशेप पावडर – २ चमचे
- हिरव्या मिरच्या – २ चिरलेली
- थोडी हिंग, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ.
डाळ कचोरीची कृती
- एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ आणि तूप घ्या. त्यात पाणी घालून पीठ मळून घ्या. त्यानंतर ते झाकून बाजूला ठेवा.
- यानंतर धुतलेल्या उडीद डाळीची पेस्ट तयार करा.
- आता कढईत तेल गरम करा. त्यात ओव्याचे दाणे टाका. त्यात भिजवलेल्या उडीद डाळीची पेस्ट घाला. त्यात लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, बडीशेप, मीठ, कसुरी मेथी आणि बेकिंग सोडा घाला.
- या सर्व गोष्टी नीट मिसळा. त्यात थोडे पाणी घाला. हा मसाला शिजल्यावर ते मिश्रण गॅसवरुन काढा. थोडा वेळ थंड होऊ द्या. नंतर त्याचे सारण तयार करा.
- यानंतर पिठाचे गोळे करून त्यात एक चमचा डाळीचे स्टफिंग टाका. त्यानंतर ते बोटांनी बंद करा. या कचोरीला आकार द्या.
हेही वाचा – फाटलेल्या दुधापासून बनवा कलाकंद; बघा सोपी- झटपट रेसिपी
- आता कढईत तेल गरम करा. त्यात एक एक करून या कचोऱ्या टाका. ते सोनेरी होईपर्यंत तळा. यानंतर तुम्ही ही कचोरी तुमच्या आवडीच्या चटणी आणि मसाला चहासोबत सर्व्ह करू शकता.