– डॉ. सारिका सातव

साहित्य

* दलिया : १ वाटी

*  मूगडाळ : पाव वाटी

*  गाजर(चिरून) : १ वाटी

* वाटाणा (हिरवा) : १ वाटी

* कांदा : १ चिरून

* टोमॅटो : १ चिरून

* मिरची मीठ : चवीपुरते

* तेल : २ चमचे

* कोथिंबीर : अर्धी वाटी

कृती

कढई तापवून मंद आचेवर दलिया भाजून घ्यावा व बाजूला काढून ठेवावा. तेल तापवून जिरे, मोहरी, हिंग, कढिपत्ता यांची फोडणी करावी. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा, चिरलेली मिरची टाकावी. नंतर गाजर, वाटाणा टाकून परतून घ्यावे. सर्वात शेवटी टोमॅटो टाकावा. सर्व भाज्या मऊ झाल्यानंतर दलिया टाकून परतून घ्यावे. वरून आवश्यकतेनुसार गरम पाणी टाकून प्रेशर कुकरमध्ये दलिया पातळसर शिजवावा.

विशेषता

* भरपूर प्रमाणात प्रथिने. तंतुमय पदार्थ अ, ब, क जीवनसत्त्व मिळते.

* चवीस उत्तम

* बनविण्यासाठीचा वेळ अत्यंत कमी

* आबालवृद्धांसाठी उपयुक्त

* मधुमेह, स्थौल्य, रक्तदाब, इ. रुग्णांमध्ये विशेष उपयुक्त.

* आवडीनुसार भाज्या कमी-जास्त करू शकता.

Story img Loader