ज्योती चौधरी-मलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

संकष्टी चतुर्थी उद्याच आहे. उपवास करा अथवा करू नका पण उपवासाचे चविष्ट पदार्थ खायला खवय्यांची कायमच तयारी असते.

साहित्य  –

दाण्याचे कूट दीड कप, पाणी ३ कप, मीठ चवीप्रमाणे, २ चमचे साखर, २-३ आमसुलं, अर्धा चमचा जिरे, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे कोथिंबीर, ३ चमचे ओलं खोबरं, २ चमचे तूप.

कृती –

सगळ्यात आधी दाण्याचे कूट पाण्यात मिसळून घ्या. त्यात मीठ, साखर, आमसुलं, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळून घ्या. यानंतर छोटय़ाशा कढल्यात तूप गरम करा. तूप कडकडीत तापले की त्यात मिरची घाला. मिरची छान तळली गेली की मग जिरे घालून ही फोडणी आमटीला द्या. वरी-तांदुळाबरोबर खाताना या चविष्ट आमटीचा झक्कास भुरका मारा.