श्री दत्त जंयती मार्गशीष महिन्यातील शुल्क पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावेळी दत्त जयंती २६ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजेच मंगळवारी आहे. भगवान दत्तात्रेय हे ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात. प्रत्येक सणामध्ये प्रसाद हा दाखवला जातो आणि त्या प्रसादासाठी वेगवेगळे प्रकारचे नैवेद्या देखील बनवले जातात. दत्त जयंतीचा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुठंवडा हा पदार्थ नैवेद्यासाठी बनवला जातो. आज आम्ही दत्त जयंतीला दिल्या जाणाऱ्या सुंठवड्याचे आरोग्यदायी फायदे आणि तो कसा तयार करायचा याबाबत माहिती सांगणार आहोत.
सुंठवडा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य –
- सुंठवड्यासाठी 200 ग्रॅम खोबरं
- १०० ग्रॅम खारीक
- २५-२५ ग्रॅम काजू
- बदाम, पिस्ता, मनुका
- एक चमचा सुंठ पावडर किंवा तुकडा
- एक चमचा बडीशेप
- एक चमचा ओवा, दोन चमचे धने
- एक चमचा तीळ
- थोडीशी मिरी, १०० ग्रॅम साखर
सुंठवडा कृती
- आधी कढईमध्ये सर्व सुखा मेवा हलकासा भाजून घ्यायचा आहे. सर्वात आधी खारीख भाजून घ्यायचे आहे.
- त्यानंतर बदाम, काजू, बडीशेप, पांढरे तीळ, खसखस, सोललेली वेलची, सुख्या खोबऱ्याचा किस हे सर्व कढईमध्ये एक एक करुन भाजून घ्या.
- त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू आणि बदाम सोडून बाकी सर्व सुकामेवा टाकून त्यामध्ये तीन चमचे साखर आणि एक चमचा खडी साखर टाकून वाटून घ्यायचे आहे.
- त्यानंतर आता यामध्ये खोबऱ्याचा किस, काजू, बदाम आणि सुंठ पावडर टाकून पुन्हा मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करुन घ्यायचे आहे.
- आता यावर मनुके टाकून सर्व मिश्रण एकत्र करुन घ्यायचे आहे. अशापद्धतीने सुंठवडा तयार झाला आहे.
हेही वाचा >> खानदेशी पद्धतीनं करा गवारीची गावरान मसालेदार रस्सा भाजी; ५ मिनिटांत बनवी ही रेसिपी
- हा सुंठवडा खायला खूप चविष्ट असतो त्यासोबत तो शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो. या जन्माष्टमीनिमित्त तुम्ही घरीच सुंठवडा तयार करु शकता.